पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मोडणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मोडणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : मोठ्या किमतीच्या चलनाच्या ऐवजी तेवढ्याच किमतीचे चलन घेणे.

उदाहरणे : त्याने दहा रुपयाच्या दहा नोटा घेऊन शंभराची नोट मोडली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बड़े सिक्के या नोट को उतने ही मूल्य के छोटे-छोटे सिक्कों या नोटों से बदलवाना।

रहीम ने रिक्शे का भाड़ा देने के लिए सौ रुपया तुड़वाया।
टोरवाना, तुड़वाना, तुड़ाना, तोड़वाना, तोरवाना, भँजाना, भुनवाना
२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : निश्चय, प्रतिज्ञा, नियम किंवा कायदा इत्यादींच्या विपरीत काम करणे.

उदाहरणे : तुम्ही सरकारी नियमांचे उल्लंघन करीत आहात.

समानार्थी : उल्लंघन करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

निश्चय, प्रतिज्ञा, नियम या विधि आदि के विपरीत काम करना या उन्हें तोड़ना।

आप सरकारी नियमों का उल्लंघन कर रहे हैं।
उलंघन करना, उल्लंघन करना
३. क्रियापद / क्रियावाचक / नाशवाचक

अर्थ : बल, प्रभाव, महत्त्व इत्यादी कमी करणे किंवा नष्ट करणे.

उदाहरणे : दीर्घकाळच्या आजाराने त्याला दुर्बल केले.

समानार्थी : दुर्बल करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बल, प्रभाव, महत्व, विस्तार आदि घटाना या नष्ट करना।

लंबी बीमारी ने उसे तोड़ दिया।
अशक्त करना, टोरना, तोड़ना, तोरना, दुर्बल करना

Weaken or destroy in spirit or body.

His resistance was broken.
A man broken by the terrible experience of near-death.
break
४. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : रूपये इत्यादींची कमी मूल्याच्या चलनात विभागणी करणे.

उदाहरणे : तू त्या दुकानात जाऊन पैसे सुट्टे कर.

समानार्थी : सुटे करणे, सुट्टे करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रुपये पैसे आदि का भंजना।

फलवाले के पास पाँच सौ का नोट नहीं टूटा।
टूटना
५. क्रियापद / क्रियावाचक / नाशवाचक

अर्थ : एखाद्या वस्तूचे अस्तित्व नाहीसे होणे.

उदाहरणे : गावातले जुने घर तुटले.

समानार्थी : तुटणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी चलते हुए कार्य या व्यवहार का इस प्रकार अंत या समाप्त हो जाना कि उसकी सब क्रियाएँ बिलकुल बन्द हो जायँ।

गाँव का पुराना स्कूल बंद हो गया है।
अंत होना, खतम होना, खत्म होना, ख़तम होना, ख़त्म होना, टूटना, न रहना, बंद होना, समाप्त होना

Destroy completely.

The wrecking ball demolished the building.
demolish, pulverise, pulverize
६. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखाद्याची वाईट प्रवृत्ती वा सवय सोडवणे.

उदाहरणे : आईने मुलाच्या वाईट सवयी मोडण्यासाठी खूप प्रयत्न केला.

समानार्थी : सोडवणे, सोडविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आदत आदि को दूर करना।

मैंने अपनी बेटी की अँगूठा चूसने की आदत को बड़ी मुश्किल से छुड़ाया।
छुड़ाना, छोड़ाना
७. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : व्रत, नियम इत्यादीत खंड पडणे.

उदाहरणे : माझे महालक्ष्मीचे व्रत मोडले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

व्रत नियम आदि भंग होना।

मेरा एक सोमवार छूट गया।
छुटना, छूटना

Be at variance with. Be out of line with.

depart, deviate, diverge, vary

अर्थ : संबंध संपुष्टात येणे.

उदाहरणे : ह्या प्रकरणामुळे त्यांची बर्‍याच वर्षांची मैत्री तुटली.
ह्या प्रकरणामुळे तिचे लग्न मोडले.

समानार्थी : तुटणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रिश्ता या संबंध आदि का टूट जाना।

सलमा की शादी टूट गई।
टूटना

Come to an end.

Their marriage dissolved.
The tobacco monopoly broke up.
break up, dissolve
९. क्रियापद / क्रियावाचक / नाशवाचक

अर्थ : तुकडे पडणे.

उदाहरणे : हातातून निसटल्याने मूर्ती तुटली

समानार्थी : तुटणे, भंगणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु के टुकड़े होना।

काँच की कटोरी हाथ से छूटते ही टूट गई।
खंडित होना, टूटना, फूटना, भंग होना, भग्न होना

Go to pieces.

The lawn mower finally broke.
The gears wore out.
The old chair finally fell apart completely.
break, bust, fall apart, wear, wear out
१०. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : रुपये, नोटा इत्यादी गोष्टी नाण्यांच्या स्वरूपात करून घेणे.

उदाहरणे : रिक्षावाल्याला पैसे देण्यासाठी त्याने पाचशेचे सुट्टे केले.

समानार्थी : मोड करणे, सुटे करणे, सुट्टे करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रुपए, नोट आदि को छोटे सिक्कों या रुपयों में परिणत करना।

रिक्शावाले को पैसे देने के लिए उसने पाँच सौ का नोट भुनाया।
टोरना, तोड़ना, तोरना, भुनाना
११. क्रियापद / क्रियावाचक / नाशवाचक

अर्थ : असलेला क्रम विस्कळीत होणे.

उदाहरणे : तो मधे घुसल्याने रांग मोडली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चलते हुए क्रम का भंग होना।

कवायद कर रहे जवानों का क्रम टूट गया।
बरसों से चले आ रहे पत्रों का सिलसिला अचानक टूट गया।
टूटना

Interrupt a continued activity.

She had broken with the traditional patterns.
break, break away
१२. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : संपविणे किंवा राहू न देणे.

उदाहरणे : त्याने रामाशी असलेले आपले संबंध तोडले.

समानार्थी : तोडणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खत्म करना या न रहने देना।

उसने राम से अपने रिश्ते तोड़ लिए।
उसने संधि तोड़ दी।
खत्म करना, टोरना, तोड़ना, तोरना, समाप्त करना

Terminate.

She interrupted her pregnancy.
Break a lucky streak.
Break the cycle of poverty.
break, interrupt

मोडणे   नाम

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : स्पर्धा इत्यादींमध्ये स्थापित केलेला सार्वकालिक विक्रम मागे टाकणे.

उदाहरणे : भारोत्तोलकाने आपला जुना विक्रम मोडला.

समानार्थी : तोडणे

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.