पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पान   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सरीसृप

अर्थ : समोरील दोन टोकदार आणि पोकळ दातांच्या वर विषग्रंथी असलेला आणि ज्याचा दंश झाल्यास विषबाधा होते असा साप.

उदाहरणे : नाग हा एक विषारी साप आहे.
माझा आजा पान लागून मेला.

समानार्थी : जहरी साप, विषारी सर्प, विषारी साप


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह सर्प जो विषैला होता है या जिसमें विष ग्रंथि पायी जाती है।

नाग एक विषधर सर्प है।
ज़हरी साँप, ज़हरीला साँप, विषधर सर्प

Any of numerous venomous fanged snakes of warmer parts of both hemispheres.

elapid, elapid snake
२. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : नागवेलीच्या पानावर सुपारी, काथ, चुना, लवंग, वेलदोडा इत्यादी पदार्थ घालून वळलेली घडी.

उदाहरणे : समारंभात जेवणानंतर सर्वांना विडे दिले.

समानार्थी : पानपट्टी, विडा

३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : पत्त्याच्या खेळातील जाड कागदाचा प्रत्येक तुकडा.

उदाहरणे : त्याने बदामाच्या पानाची उतारी केली.

४. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : पुस्तक किंवा वहीतील पाठपोट असलेल्या कागदापैकी प्रत्येक.

उदाहरणे : मुलाने ह्या पुस्तकाचे पान फाडले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी पुस्तक या कापी आदि में लगी हुई वह वस्तु जिसके दोनों ओर कुछ लिखा होता है या लिखते हैं।

बच्चे ने इस पुस्तक का एक पन्ना फाड़ दिया।
पन्ना

A sheet of any written or printed material (especially in a manuscript or book).

folio, leaf
५. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : वल्ह्याच्या पुढल्या टोकाला असलेला चपटा भाग.

उदाहरणे : वल्ह्याच्या पात्याने भराभर पाणी कापले जात होते.

समानार्थी : पात

अर्थ : सोने किंवा इतर धातूचा पातळ पत्रा.

उदाहरणे : मिठाई चांदीच्या वर्खात गुंडाळली होती

समानार्थी : वरख, वर्ख


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सोने, चाँदी आदि का बहुत पतला पत्तर।

मिठाइयों को चाँदी का वरक़ लगाकर सजाया गया है।
तबक, तबक़, वरक, वरक़, वर्क, वर्क़

A piece of thin and flexible sheet metal.

The photographic film was wrapped in foil.
foil
७. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : नांगराच्या फाळावरील लाकडी तुकडा.

उदाहरणे : नवीन पान बसवून घ्यावे लागेल

८. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : छपराच्या वाशांचे शेवट ज्यात बसवतात ते लाकूड.

उदाहरणे : ह्या छपराचे पान बदलावे लागेल

९. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : समारंभ इत्यादीतील जेवणारी किंवा जेवलेली माणसे.

उदाहरणे : गोट्याच्या मुंजीत पाचशे पाने उठली

१०. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : चर्मवाद्याच्या तोंडावर बसवलेले कातडे.

उदाहरणे : या ढोलकीचे दुम्याचे पान फुटले आहे

११. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : गंजीफा खेळातील जाड कागदाचा प्रत्येक तुकडा.

उदाहरणे : गंजीफ्यातील पान चांगले कलात्मक आणि गोल असते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गंजीफा खेल का मोटे कागज़ का प्रत्येक टुकड़ा या भाग।

गंजीफा का पत्ता कलात्मक और गोल होता है।
पत्ता
१२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : धोतरजोडीपैकी एक नग.

उदाहरणे : आजोबांसाठी नवे धोतराचे पान आणले

समानार्थी : फरद, फर्द

१३. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : नागवेलीचे पान.

उदाहरणे : पूजेसाठी दहा पाने लागतील


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक लता का पत्ता जिस पर कत्था, चूना आदि लगाकर और उसका बीड़ा बनाकर खाया जाता है।

वह पान तोड़कर टोकरी में रख रहा है।
अभीष्टा, अहिबेल, अहिलता, अहिवल्ली, तंबोल, तम्बोल, तांबूल, तामोर, ताम्बूल, नागपत्र, नागबेल, नागबेलि, नागरबेल, नागलता, पान, महादंता, महादन्ता, रंगदलिका
१४. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लहान मुलांच्या, स्त्रियांच्या, पुरुषांच्या गळ्यात घालायचा पानाच्या आकाराचा एक दागिना.

उदाहरणे : बाळाच्या गळ्यात जिवतीचे पान बांधले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गले में पहना जाने वाला पान के आकार का एक आभूषण या गहना।

बच्चे के गले में पान पहनाया गया है।
पान

Jewelry consisting of a cord or chain (often bearing gems) worn about the neck as an ornament (especially by women).

necklace
१५. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : नागवेलीची पाने, सुपारी, काथ, चुना, लवंग, वेलदोडे घालून वळलेली घडी.

उदाहरणे : समारंभात जेवणानंतर सर्वांना विडे दिले

समानार्थी : पानपट्टी, विडा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पान का वह रूप जो कत्था, चूना लगाकर उसे लपेटने या तह करने पर होता है।

वह पान मुँह में लेकर चबाने लगा।
खिल्ली, गिलौरी, पान, बिड़िक, बीड़ा
१६. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : पुस्तक किंवा वहीच्या पानाच्या पाठपोट बाजूंपैकी प्रत्येक.

उदाहरणे : सम क्रमांकाच्या पृष्ठावर विषयाचे शीर्षकही दिले आहे

समानार्थी : पृष्ठ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पुस्तक के पन्ने के एक ओर का तल या भाग।

इस पुस्तक का प्रत्येक पृष्ठ मैं पढ़ चुका हूँ।
पृष्ठ, पेज

One side of one leaf (of a book or magazine or newspaper or letter etc.) or the written or pictorial matter it contains.

page
१७. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : जेवणाच्या उपयोगाचे उथळ व पसरट धातूचे पात्र.

उदाहरणे : जेवल्यानंतर आपले ताट स्वतः उचलून ठेवावे.
पाने वाढली आहेत.

समानार्थी : ताट, थाळी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भोजन करने का एक छिछला बर्तन।

माँ बच्चे को थाली में खाना खिला रही है।
थरिया, थाली, पिठर, पिठरक, पिठरी, पिठारका

Dish on which food is served or from which food is eaten.

plate
१८. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : झाडाच्या डहाळीवरील हिरव्या रंगाचे लहानमोठे, पातळ अवयव.

उदाहरणे : वसंत ऋतूत झाडावर नवीन पाने येतात

समानार्थी : दल, पत्री, पर्ण, पात


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पेड़-पौधों में होने वाला विशेषकर हरे रंग का वह पतला, हल्का अवयव जो उसकी टहनियों से निकलता है।

वह बाग में गिरे सूखे पत्ते एकत्र कर रहा है।
छद, दल, पत्ता, पत्र, पत्रक, परन, पर्ण, पात, वर्ह

The main organ of photosynthesis and transpiration in higher plants.

foliage, leaf, leafage
१९. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : बाण वा भाला आदींच्या पुढचा तीक्ष्ण व धारदार भाग.

उदाहरणे : बाणाची पात वाघाच्या शरीरात रुतून बसली.

समानार्थी : पात, पाते, फाळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तीर, तलवार या बरछी आदि के तेज धारवाला या आगे का धारदार भाग।

इस तीर का फल बहुत नुकीला है।
अँकड़ा, अँकुड़ा, अंकड़ा, अंकुड़ा, आँकुड़ा, गाँस, गाँसी, गांस, गांसी, गासी, फल
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.