अर्थ : एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाण्यासाठी पावले टाकणे.
उदाहरणे :
काल मी बसस्थानकापर्यंत चालत गेलो
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : काठी इत्यादीचा वापर किंवा प्रहार करणे.
उदाहरणे :
आंदोनलकर्त्यांवर पोलिसांच्या निर्दयीपणे लाठ्या चालल्या.
रावतांच्या वस्तीत काठ्या चालल्या.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : व्यवहारात किंवा वापरात असणे.
उदाहरणे :
माझी दहा वर्ष जुनी कार आजदेखील चालत आहे.
समानार्थी : काम करणे, वापरात असणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
आचरण या व्यवहार में होना या आना या प्रयोग करने पर आशानुरूप काम करना।
मेरी दस साल पुरानी कार आज भी चल रही है।अर्थ : प्रवाहित होणे.
उदाहरणे :
नदीत एक नाव चालली आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : प्रतिसाद मिळाल्यामुळे खेळ होत राहणे.
उदाहरणे :
हे नाटक बरेच चालले.
अर्थ : ज्यात एखादी गोष्ट आपले स्थान बदलत राहते अशा तर्हेच्या गतिमान स्थितीत असणे.
उदाहरणे :
इंधनच नसेल तर गाडी कशी चालेल?
समानार्थी : धावणे
अर्थ : हेतुपूर्ततेला उपयोगी पडणारे असणे.
उदाहरणे :
चूल पेटवायला ओली लाकडे कशी चालतील?
समानार्थी : धकणे
अर्थ : शेवटपर्यंत चांगल्या तर्हेने टिकून राहणे.
उदाहरणे :
माझे हे घड्याळ बरीच वर्षे चालले.
या कामात माझा टिकाव लागणार नाही.
समानार्थी : टिकणे, टिकाव लागणे, निभाव लागणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : मान्यता असणे.
उदाहरणे :
हे नाणे कुठे चालते?
अर्थ : वर्चस्व असणे.
उदाहरणे :
मृत्यूपुढे कुणाचे काय चालेल?
इतर भाषांमध्ये अनुवाद :
दबदबा होना या अधिकार, युक्ति, वश, शक्ति आदि का ठीक और पूरा काम करना अथवा परिणाम या फल दिखाना।
गाँव में उसकी बहुत चलती है।अर्थ : सुरू असणे.
उदाहरणे :
त्याचा अभ्यास रात्री उशिरापावेतो चालतो
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : पुरेसे असणे.
उदाहरणे :
तुमचे इतक्या कमी पगारात कसे भागते?
इतर भाषांमध्ये अनुवाद :
निभना या निभाना।
उनका इतने वेतन में ही गुजारा हो रहा है।अर्थ : एका विशेष बिंदूपर्यंत किंवा मर्यादेपर्यंत पसरलेला असणे किंवा जाणे.
उदाहरणे :
सतत दोन तासानंतर त्या कामात त्याची बुद्धी चालत नाही.