पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील काटा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

काटा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग
    नाम / सामान्यनाम

अर्थ : अणकुचीदार टोक असलेला झाडाच्या फांदीवरील काडीसारखा भाग.

उदाहरणे : माझ्या पायात खोलवर काटा रुतला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वृक्ष की टहनियों,तनों,पत्तियों आदि से निकले नुकीले भाग जो सुई के समान होते हैं।

जंगल से गुज़रते समय उसके पैर में काँटे चुभ गए।
कंटक, काँटा, कांटा, पत्रसूची, शूल

A small sharp-pointed tip resembling a spike on a stem or leaf.

pricker, prickle, spikelet, spine, sticker, thorn
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लोखंडाची सरळ वा वाकलेली खीळ.

उदाहरणे : तो खेळणी बनवायला काट्याचा वापर करतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लोहे की मुड़ी या सीधी कील।

वह लकड़ी के खिलौने बनाने में काँटा इस्तेमाल करता है।
काँटा, कांटा

A thin pointed piece of metal that is hammered into materials as a fastener.

nail
३. नाम / भाग

अर्थ : माशाच्या शरीरातील हाड.

उदाहरणे : मासा खाताना त्याच्या तोंडात काटा बोचला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मछली के शरीर के अंदर पाई जानेवाली काँटे जैसी अस्थि।

मछली खाते समय रामू के मुँह में काँटा चुभ गया।
काँटा, कांटा, मत्स्य कंटक

A bone of a fish.

fishbone
४. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : नाण्याच्या ज्या बाजूला त्याच्या किंमतीचा आकडा असतो ती बाजू.

उदाहरणे : काटा की छापा ते सांग.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सिक्के का वह पहलू जिसमें उसकी क़ीमत अंक में होती है।

चित या पट बोलिए।
टेल, पट, पट्ट
५. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : अतिशय आनंद, भय इत्यादी विकारांच्या प्राबल्याने किंवा गारठ्याच्या जाणिवेमुळे अंगावरील उभा राहिलेला केस.

उदाहरणे : मारेकर्‍याला समोर पाहून त्याच्या अंगावर काटा आला.

समानार्थी : रोमांच, शहारा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

+अत्यधिक आनंद,भय आदि विकारों के प्राबल्य से या अत्यधिक ठंड के एहसास से शरीर पर खड़ा होने वाला बाल।

भय के कारण श्याम के रोंगटे खड़े हो गये।
रोंगटा, रोआँ
६. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : वजन मापण्याचे पारडी नसलेले किंवा एकाच पारड्याचे यंत्र.

उदाहरणे : काट्यावर नेऊन या सामानाचे वजन करा.

समानार्थी : वजनकाटा

७. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : अणकुचीदार, लांब असा, विशिष्ट प्रमाण दाखवणारा मापण्याच्या साधनाचा एक भाग.

उदाहरणे : कंपासातीस काटा उत्तर व दक्षिण ही दिशा दाखवतो.

समानार्थी : दर्शक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी मापक उपकरण में लगा वह लंबा, पतला, नुकीला भाग जो किसी माप को दर्शाता है।

कंपास का काँटा उत्तर दक्षिण दिखाता है।
काँटा, कांटा

A pointed projection.

prong
८. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : दोन पारडी असलेले पदार्थाचे वजन करण्याचे साधन.

उदाहरणे : शेतकरी धान्य मापण्यासाठी तराजू ठेवतात.

समानार्थी : तराजू, तागडी, तुला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई वस्तु आदि तौलने का एक उपकरण जिसमें एक डाँड़ी के दोनों सिरों पर दो पल्ले लटकते रहते हैं।

किसान अनाज़ आदि तौलने के लिए तराजू रखते हैं।
काँटा, कांटा, तक, तकड़ी, तखरी, तराजू, तुला, तुला यंत्र, धट

A scale for weighing. Depends on pull of gravity.

balance
९. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : विंचू इत्यादींचा, मागील बाजूस असणारा, दंश करणारा अवयव.

उदाहरणे : विंचवाची नांगी धरली की त्याला सहज हातात उचलता येते.

समानार्थी : नांगी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बिच्छू, मधुमक्खी आदि कीड़ों के पीछे का जहरीला काँटा जिसे वे जीवों के शरीर में धँसाकर जहर फैलाते हैं।

उसे बिच्छू ने डंक मार दिया।
आड़, आर, डंक, दंश

A sharp organ of offense or defense (as of a wasp or stingray or scorpion) often connected with a poison gland.

stinger
१०. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : कोणतीही टोकदार काट्यासारखी गोष्ट.

उदाहरणे : फणसाला वरून काटे असतात पण आत गोड गरे असतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सूई या कील के समान कोई नुकीली वस्तु।

राम ने चारदीवारी पर काँटे लगवाए।
काँटा, कांटा

An iron spike attached to the shoe to prevent slipping on ice when walking or climbing.

climber, climbing iron, crampon, crampoon
११. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : त्रिशुळासारखी अणकुचीदार पाती असलेला पाश्चात्त्य पद्धतीचा चमचा.

उदाहरणे : काट्याने सर्वांना खायला जमत नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

त्रिशूल के समान एक उपकरण जिससे लोग भोजन करते हैं।

काँटा,छुरी से खाना खाना सबको नहीं आता।
काँटा, कांटा

Cutlery used for serving and eating food.

fork
१२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

अर्थ : एखाद्या उपकरणाचा दर्शक जो परिमाण, अंक वा दिशा सूचित करतो.

उदाहरणे : त्या घडाळ्याचे काटे फारच मोठे आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी उपकरण आदि में वह तार या काँटा जो किसी विशेष परिमाण, अंक, दिशा आदि का सूचक होता है।

इस घड़ी की घंटे वाली सूई रुक गई है।
सुई, सूई

A slender pointer for indicating the reading on the scale of a measuring instrument.

needle
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.