निरुद्देश (क्रियाविशेषण)
उद्देशावाचून.
कंदील (नाम)
वार्याने ज्योत विझू नये म्हणून ज्याच्या भोवती काच बसवलेली असते असा, खालच्या बाजूला इंधनाची टाकी असलेला, कडीला धरून कोठेही नेता येईल असा दिवा.
पवित्र (विशेषण)
ज्यात मळ वा दोष नाही असा.
हळद (नाम)
ज्याचे मूळ मसाल्यात कामी येतात ते झाड.
पराकाष्ठा (नाम)
एखादी गोष्ट किंवा कृती इत्यादीचे टोक.
पितृपक्ष (नाम)
भाद्रपदाच्या कृष्णपक्षाच्या पंधरवड्यात पितरांकरिता पिंडदान, श्राद्ध इत्यादी करावयाचा काळ.
निरक्षर (नाम)
शिक्षित नसलेली व्यक्ती.
दूत (नाम)
एखाद्यास बोलावण्यासाठी, निरोप किंवा पत्र देण्यासाठी वा शिष्टाईसाठी पाठवलेला मनुष्य.
निरोप्या (नाम)
एखाद्यास बोलावण्यासाठी, निरोप किंवा पत्र देण्यासाठी वा शिष्टाईसाठी पाठवलेला मनुष्य.
ब्रह्मचारी (नाम)
स्त्रीसंगपरित्यागाचे व्रत आजन्म किंवा काही काळपर्यंत पाळणारा मनुष्य.